मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधारी-विरोधकांचे संख्याबळ समसमान

Foto
मुंबई  : मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे संख्याबळ स्पष्ट झाले असून, त्या आधारे महापालिकेतील समित्यांमध्ये प्रतिनिधित्व निश्चित होत आहे. मात्र सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती यंदा विशेष चर्चेत आली आहे. कारण या समितीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे संख्याबळ समसमान झाले आहे.

स्थायी समितीवर सत्ताधारी बाजूने भारतीय जनता पार्टीचे  १० आणि शिवसेना शिंदे गटाचे ३ सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांची युती असल्याने सत्ताधारी गटाचे एकूण संख्याबळ १३ झाले आहे. दुसरीकडे विरोधी बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे  ८, काँग्रेसचे ३, मनसेचा () १ आणि एमआयएमचा () १ सदस्य आहे. त्यामुळे विरोधकांचेही एकूण संख्याबळ १३ इतकेच आहे. या समसमान स्थितीमुळे स्थायी समितीत कोणताही निर्णय पारित करणे सत्ताधार्‍यांसाठी सोपे राहणार नाही. अर्थसंकल्पीय मंजुरी, मोठे प्रस्ताव, धोरणात्मक निर्णय अशा प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात स्थायी समितीतील प्रत्येक बैठकीत राजकीय गणित आणि समन्वयाला अधिक महत्त्व येणार असल्याचं चित्र आहे.

स्थायी समिती 
एकूण सदस्यांची संख्या २३ 
भाजप १० 
शिवसेना ३
एकूण संख्या बळ १३

विरोधक 
शिवसेना उद्धव ठाकरे गट ८ 
काँग्रेस ३ 
मनसे  १
एमआयएम १
 एकूण संख्याबळ १३

इतर समित्यांमध्ये कुणाला किती जागा?

दरम्यान, शिक्षण समितीच्या २२ सदस्यांमध्ये भाजपचे ९, शिवसेना (उबाठा) ६, शिवसेना ३, काँग्रेस २ तर मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी २  सदस्यत्व मिळणार आहे. याशिवाय चार बिगर-मनपा सदस्यांपैकी भाजपला २, तर दोन्ही शिवसेनांना प्रत्येकी १ सदस्य मिळेल.

बेस्ट समितीवर एकूण १६ सदस्य असतील. त्यामध्ये भाजपचे ६, शिवसेना (उबाठा) ५, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी २, तर एमआयएमचा १ सदस्य असेल. मनसेला मात्र बेस्ट समितीत सदस्यत्व मिळणार नाही. तसेच, विशेष समितीमध्ये एकूण ३६ सदस्य असतील. या समितीत भाजपचे १४, शिवसेना (उबाठा) १०, शिवसेना ५, काँग्रेस ४, तर मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी १ सदस्यत्व मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या समितीत केवळ एकच सदस्य देता येणार आहे.